शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर के.एम.टी. तेरा कर्मचाºयांना बडतर्फ करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 20:59 IST

कोल्हापूर : गेल्या सहा महिन्यांपासून गैरहजर राहिलेल्या तेरा कायम कर्मचाºयांना बडतर्फ करण्यात यावे, अशी शिफारस के.एम.टी. प्रशासनाने महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे गुरुवारी केली.

ठळक मुद्देप्रशासनाची आयुक्तांकडे शिफारसजबाबदारी म्हणून कायम, रोजंदारी व ठोक मानधनावरील तब्बल ९५ चालकांवर कारवाई किमान १० चालक तरी के.एम.टी.कडे परत मिळावेत,

कोल्हापूर : गेल्या सहा महिन्यांपासून गैरहजर राहिलेल्या तेरा कायम कर्मचाºयांना बडतर्फ करण्यात यावे, अशी शिफारस के.एम.टी. प्रशासनाने महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे गुरुवारी केली. के.एम.टी.ची आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या प्रक्रिया गतिमान झाली असून त्याचाच एक भाग म्हणून ही शिफारस केली असून आयुक्तांच्या मान्यतेने लवकरच बडतर्फीची कारवाई केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.बुधवारी दुपारनंतर अचानक दांड्या मारल्याने शहरातील ४० मार्गांवरील बससेवा बंद ठेवावी लागली होती. त्याची जबाबदारी म्हणून कायम, रोजंदारी व ठोक मानधनावरील तब्बल ९५ चालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यातील २५ ठोक मानधनावरील चालकांना बडतर्फ करण्यात आले होते. कारवाईचा पुढील टप्पा म्हणून गेल्या सहा महिन्यांपासून सतत गैरहजर राहिलेल्या १३ कर्मचाºयांना बडतर्फ करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. के.एम.टी.चे प्रभारी अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय भोसले यांनी गुरुवारी आयुक्त अभिजित चौधरी यांची भेट घेऊन या कर्मचाºयांना बडतर्फ करण्यात यावे, अशी शिफारस केली.

बुधवारी ४० मार्गावरील बससेवा चालकांअभावी बंद राहिल्यामुळे असाच प्रकार पुन्हा घडू नये म्हणून गुरुवारी के.एम.टी. प्रशासनाने कायम, रोजंदारी व ठोक मानधनावर काम करणाºया सर्व चालकांना व्यक्तिश: फोनवर संपर्क साधून ड्युटीवर येण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे शहरातील सर्व मार्गावरील बस वाहतूक सेवा सुरळीत होती. १०७ मार्गांवर बसेस धावल्या तरीही दोन चालक पूर्वनियोजित ड्यूटीवर गेले नाहीत. त्यांच्यावरही बडतर्फीची कारवाई करण्यात येणार आहे.

ठोक मानधनावरील कर्मचारी कामावर आले नाहीत तर त्यांच्यावर कामावरून कमी करण्यापलीकडे कोणतीही कायदेशीर कारवाई करता येत नाही. त्यामुळे प्रशासनही हतबल झाले आहे. २५ चालकांना बडतर्फ केल्यामुळे तेवढेच आता नव्याने भरावे लागणार आहेत.४० चालक मनपाकडेके.एम.टी.कडे चालकांचा प्रश्न गंभीर असतानाही मूळचे के.एम.टी.चे ४० कायम चालक महानगरपालिका प्रशासनाने त्यांच्या वाहनांकरीता घेतले आहेत. हे चालक पदाधिकारी, अधिकाºयांच्या वाहनांवर ड्युटी करत आहेत. त्यापैकी किमान १० चालक तरी के.एम.टी.कडे परत मिळावेत, अशी मागणीही संजय भोसले यांनी आयुक्तांकडे केली.प्रतापराव भोसले तांत्रिक सल्लागारपदीवाहतूक क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असलेले प्रतापराव भोसले यांना ‘तांत्रिक सल्लागार’ म्हणून के.एम.टी.च्या सेवेत घेण्याचा निर्णय आयुक्त चौधरी यांनी गुरुवारी घेतला. भोसले यांना आज, शुक्रवारीच सेवेत सामावून घेतले जाईल. त्यांच्याकडे वर्कशॉप तसेच वाहतूक व्यवस्था कशी सुधारता येईल याचे नियोजन दिले जाणार आहे.

 

टॅग्स :Travelप्रवासcommissionerआयुक्त